उत्तराखंड महाप्रलय: महादेवाचा तिसरा डोळा.

केदारनाथ मंदिर  1882 – 1883 
उत्तराखंड  मध्ये आलेल्या महाप्रलयात  आपले बहुतांश बंधू भगिनी मृतू मुखी पडले. ज्यांनी कधी देवदर्शनाला जाताना असे होईल असे स्वप्नातही पाहाले नसेल कदाचित?  परंतू जी होणारी घटना राहते ती कधी टळत नाही. असाच काहीसा प्रकार केदारनाथ मध्ये  झाला याची  आपल्याला कल्पना आहेच. त्याच कालावधीत वृत्वाहीनीवर  पुणे येथील एक विचारवंत  आपले विचार मांडत असतानी  त्यांनी  केदारनाथ म्हणजेच संपूर्ण हिमालय हि "देव भूमी" व  पवित्र अशी भूमी असताना  तिला पर्यटनाचा दर्जा देऊन त्या पवित्र भूमीला "भोग भूमी" बनवलय. असे त्यांचे म्हणणे होते  माझ्या लक्ष्यात आले व ते एकदम बरोबर बोलले कारण ज्या भूमीत आधीचे ऋषी-मुनी, साधू-संत ब्रम्हचारी राहून तप-साधना  शक्ती  प्राप्त करत होते.  मात्र आता याच्या उलटसुलट होत आहे मोठमोठाले हॉटेल उभारले ते लोकांना हनिमून साठी,  हे  कितपत योग्य आहे?   याचा पुन्हा एक प्रतय मला लोकमत मध्ये  केदारनाथ मंदिराचा फोटो प्रकाशित झाल्यानंतर आला ते म्हणजे असे कि लोकमत ने तीन फोटो प्रकाशित केले एक फार जुना एक मागील काही वर्षीचा व एक आताचा म्हणजे तबाही नंतरचा. त्यात एक साम्य होते फार वर्षाच व आताचा फोटोत काहीच फरक नव्हता. कारण पूर्वी मंदिराचे सभोवताल काहीच नव्हते अन आत्ता सुद्धा सर्व नेस्तनाभूत झाले. याचा अर्थ एकाच म्हणावा लागेल शंकराला सभोवताल काहीच नको आहे. कारण आपण पचमढी म्हणा किव्हा सालबर्डी त सुद्धा देव खूप उंचावर जाऊन बसलेले आहे तरीसुद्धा मानवाने तिथेही शोध लाऊन वस्ती थाटायला सुरुवात केली आहे. भगवान शंकरजी देवो के देव महादेव आहे  व त्यांचा  क्रोध पण खुप भारी आहे सर्वाना माहित आहेच त्यांनी जर त्यांचा तिसरा डोळा उघडला तर खूप काही होऊ शकते याचेच उदाहरण "महाप्रलय" याची देही याची डोळा सर्व भारतीयांनी पहिला. तरी सुद्धा आपण यातून काही धडा घेतोय का हा खरा प्रश्न आहे?

Previous Post Next Post
Dhiraj Manmode'S Blog
Dhiraj Manmode'S Blog