महाराष्ट्र शाषणाच्या समाज कल्याण खात्याच्या वतीने उच्च माध्यमिक स्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण करिता शिषवृत्ती दिली जाते. परंतु खरे पाहता या शिषवृत्ती चा फायदा मुळात शिक्षण घेत असताना अजिबात होतच नाही. कारण कि शाषनच्या वतीने हि स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात न मिळता वर्ष संपल्यावरच मिळते. त्यातही कुठे अर्धीच दिल्या जाते. समाज कल्याण खात्याच्या वतीने त्यांच्या संकेत स्थळावर या शिषवृत्तीच्या वेगवेगळ्या योजनाचा परिचय दिला आहे परंतु योजेनांचे उद्देश पाहत समाज कल्याण विभाग या उद्देशाकडे किती गंभीरतेने पाहते हे लक्षात येते. सामाजिक न्याय व विशेष सह्हाय विभागाच्या वतीने शिषवृत्ती योजेनेच्ये उद्देश खालील प्रमाणे आहे.
योजनेचा उद्देश
१) शिक्षणासाठी आर्थिक सहकार्य उपलब्ध करून देणे.
२) त्यांच्यातील शिक्षणाच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे.
३) त्यांना उच्च शिक्षण घेण्याची आवड निर्माण व्हावी.
४) विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळावी.
असे उद्देश असताना मात्र वास्तविक जीवनात भलतेच प्रकार पाहायला मिळतात, ते असे कि स्कॉलरशिप वेळत मिळत नाही प्रथम वर्षाची द्वितीय वर्षात आणि द्वितीय वर्षाची शेवटच्या वर्षाला आणि शेवटच्या वर्षाची तर महाविद्यालय सोडून दुसऱ्या महाविद्यालयात गेल्यावर मिळते.....ज्या वर्षाची स्कॉलरशिप त्याच वर्षात मिळाली तर विद्यार्थ्यांना आर्थिक मदत होईल... याचा समाज कल्याण विभागाने गांभीर्याने विचार करायला हवा...