
जिकडे तीकडे धुमधडाक्यात विश्वकप पार पडाला. सगळ्या स्तरावरुन प्रत्येक खेळाडुंचे स्वागत झाले. वेळाने का असेना विश्वकप भारताने मीळविलाच. पण मला एक जाहीरपणे सांगायचे आहे की, सामना चालु असतांना तिथे आम्ही भारतीय आहो, आणि आमच्यात आमच्या देशाच्या टीम विषयी खुप अभिमान आहे, हे दाखविण्यासाठी तुम्ही भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचा सरळ सरळ अपमान करत आहे. ज्याला स्वातंत्र करण्याकरीत्या कीत्येकांनी आपले प्राण गमावले.
त्याला गळ्यात गुडांळणे, जोरजोराने हलविने. इत्यादी प्रकार अख्ख विश्व पाहत असते. मान्य आहे, आपल्या देशाच्या टीम चे कौतुकच करायचे आहे तर खेळाडुंचे पोर्स्टस छापुन प्रोत्साहन देता येवु शकते. त्यासाठी ध्वजाचा अवमान करण्याची काही एक गरज नाही, कारण आपली लायकी नाही त्याचा अवमान करायची. आज कुठेतरी हे थांबवायला हवे.