देशाचे कृषीमंत्री पद भूषवित असलेले विद्यमान मंत्री नामदार श्री शरदचंद्र जी पवार साहेबांवर सध्या कुठून ना कुठून संकट येत असल्याचे चित्र दिसत आहे. आधी भर कार्यक्रमात त्यांच्यावर भ्याड हल्ला झाला तर तेथून लगेच काही दिवसात दुसऱ्या कार्यक्रमात भाषण दयायच्या वेळेस छतवरील पंखा अचानक तुटून पडला त्यात हि पवार साहेब बालबाल बचावले, साहेबांच्या मागे चालू असलेली विघ्ने पाहता साहेबांवर वरचा देव नाराज तर नाही ना? असा प्रश्न आम्हाला तरी पडला आहे. साहेबांनी काय भले देवाचे वाकडे केले हे त्यांना सुद्धा कळले नसेल परंतु एक सांगू इच्छितो, शेतकरी संघटनेतून पुढे आलेले पवार साहेब आता शेतकऱ्यांच्या हिताचे इच्छित नसल्याने त्यांना अश्या प्रकारच्या समस्याना सामोरे जावे लागते आहे. ज्यांनी आपली राजकीय कारकीर्द शेतकर्यांचे सह्हायाने सुरु केली व देशाचे कृषी मंत्री पद भूषवित आलेले व आता हि भूषवित असलेले पवार साहेब आपल्या शेतकर्यांना त्याच्या शेती मालाला पूरक असा हमी भाव का देत नाही? कापसा सारखा जिवंत प्रश्न घेतला तर कापसाला हमी भाव फ़क़्त ३३०० रुपये. अहो साहेब आतची मजुरी आणि आधीची यात जमीन-आसमान चा फरक पडला आहे. कदाचित तुमचे सरकारी रेत वेगळे असतील परंतु वास्तवातले मात्र वेगळे आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना तो भाव अजिबात परवडत नसल्याने तो तुमच्या मागे भाव वाढीसाठी तगादा लाऊन बसला आहे. हे आपल्याला अजून कसे कळले नाही हेच समजत नाही. शेवटी एवढंच म्हणेल कि तुम्हाला शेतकऱ्यांनी आधी जशी साथ दिली तशी शेवट पर्यंत हवी असेल तर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय मंत्री मंडळात घ्या त्यांच्या मालाला योग्य तो हमी भाव द्या. तेव्हा कुठे तुम्हाला शेतकऱ्यांचा प्रदीर्घ आशीर्वाद लाभेल.