कधी मिळणार शेतकऱ्यांना न्याय...?

बळीराजाचा पांढर सोन म्हणून ओळखला जाणारा कापूस या वर्षी चांगलाच पेटला. विदर्भ, मराठवाडा सहित कापसाच्या भाववाढी साठी आंदोलने झाली, काही राजकीय पक्षांच्या दिंड्या, यात्रा निघाल्या. या वरून संपूर्ण एक आठवडा सुद्धा निघून गेला परंतु बळीराजाच्या कापसाला काही भाव जसा पाहिजे तसा मिळाला नाही... ? या वरून सरकार किती गंभीर तेने शेतकऱ्यान कडे पाहते आहे हे स्पष्ट लक्षात होते. ज्याच्या भरवशावर अख्खा जग जगते त्यालाच हे निर्लज्ज सरकार उपाशी ठेवण्याच पुरेपूर प्रयत्न करत आहे. एकीकडे भारतात थेट विदेशी कंपन्यांना गुंतवणुकीसाठी सरकार परवानग्या देत आहे, परंतु स्वताच्या देश्यातील छोटे मोठे व्यापाऱ्यांचा विचार हे सरकार विसरत आहे. तर दुसरीकडे शेतीमाल (निवडक) निर्यात बंदी घालत आहे. कापसाला निदान पाच हजारापेक्षा तरी जात हमी भावाची ओरड शेतकऱ्यांची असताना. या सरकारला जाग येत नाही आहे. जर आज शेतकऱ्यांनी ठरवलं कि यानंतर आपल्या पुरते पिक पिकवायचे व व बस..? तर अख्या जगाला उपासमारीची पाळी येऊ शकते हे मात्र खरे!
Previous Post Next Post
Dhiraj Manmode'S Blog
Dhiraj Manmode'S Blog