सध्याच्या महागाईच्या जमान्यात ज्याचे त्याचे भाव आकाशाला टेकले आहे. त्यातच सर्वांची गरज असलेले पेट्रोल व डीझेल च्या किमती गगनाला टेकल्या आहे. आता केंद्र सरकारने पेट्रोल चे भाव एकदम ५ रुपयांनी वाढवले आणि लोकांना ४४० वोल्टचा झटका दिला. हे निर्लज्ज सरकार एकदम महत्वाच्या वस्तूचे भाव का वाढवितात आणि आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत याचेच भाव का वाढतात हा मोठा प्रश्नच आहे. पेट्रोल च्या किमती मागील वर्ष वासून ३-४ वेळा वाढविण्यात आल्या. जागोजागी संपूर्ण देशात विरोधकांनी त्याचा निषेधही केला पण फायदा काय? काहीच नाही सरकार म्हणते आम्ही करू तरी काय? ते आंतरराष्ट्रीय बाजार पेठेला दोष देतात. मात्र या मध्ये सामान्य नागरिकांची पिळवणूक होते. कारण आज पर्यंत कोणत्या मंत्र्याला पेट्रोल वाढीचा दासका बसला. त्यांना काही गम नाहो पेट्रोल वाढले काय आणि उतरले काय. ते मस्त सरकारी तिजोरीतील लोकांच्या पैशावर चालणाऱ्या गाड्या-घोड्यानी फिरतात ना? कोणत्याही कार्यक्रमाला जायचे असले तो सरकारी नसला तरी तेथे सरकारी च गाडी जाते. मात्र एकीकडे सामान्य माणसाला गाडी कितीही महत्वाची असली तरी तो सायकलच वापरतो. आज कुठेतरी या महागाईवर अंकुश लागायलाच.
