भारतात किती मोठा भ्रष्टाचार चालतो हे आता प्रत्येकालाच चांगले ठाऊक झाले आहे आपलेच मंत्रीजंत्री किती स्वच्छ प्रतिमेचे आहेत आता लोकांना कळलेले आहे त्यात तर आता प्रत्येकाला मेडिया ने चांगलेच पेचात पकडल्यामुळे जेह्लात सुद्धा पाठविले आहे. पण ते मोठे नेते असल्या मुले जेह्लात सुद्धा त्यांना चांगले शाही राहायला मिळत आहे. आता हेच बघा ना आज दि.२० ला अटक झालेल्या करुणानिधींच्या मुलगी "कानिमोझी" हिला तेहार जेह्लात पाठविण्यात आले आहे. त्याच जेह्लात मोठमोठाले नावांची वक्ती सुद्धा आहे. कलमाडी असो कि मग ए राजा असो.याच जेह्लात आहे. पण सामान्य नागरीका पेक्षा यांना तुरुंगात टीवी सहित चांगल्या सुविधा सरकारने उपलब्ध करून दिल्या त्या कशासाठी? सामान्य नागरीका सारखी वागणूक यांना द्यायला हवी आहे.
